स्मार्ट बँकिंग

paperless-banking-img

पेपरलेस बँकिंग

आमचे ग्राहक नेहमीच जगाप्रमाणे अपडेट असावे व येणाऱ्या आधुनिक क्रांतीसाठी ते तयार असले पाहिजे या हेतूने संस्थेने नेहमीच काळाची गरज ओळखून पाऊले उचलली आहे. संस्थेच्या खातेदारांना NEFT / RTGS / IMPS सुविधा, DD, चेक क्लिअरन्स सुविधा, भारतात कुठेही पैसे पाठविण्याची आणि स्विकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. आधुनिक बँकिंगचा जास्ती-जास्त खातेदारांनी लाभ घ्यावा यासाठी पुढील सुविधा पुरविल्या जातात.

mobile-banking-img

मोबाईल बँकिंग

ग्राहकांचे व्यवहार अधिक गतिमान व रोकड विरहित (कॅशलेस) व्हावे यासाठी व्यंकटेश मल्टिस्टेट मोबाईल बँकिंग हि सुविधा देत आहे. याद्वारे ग्राहक त्याच्या मोबाईल फोन वरून पैसे देणे-घेणे, बिल भरणे, खात्यातील शिल्लक तपासणे इ. कामे करू शकतो. हे मोबाईल अँप वापरण्याकरता अत्यंत सोपे आहे तसेच कुठल्याही अडचणीकरता संस्थेच्या टोल फ्री क्रमांवर संपर्क साधून ग्राहकांना बोलता येते.

internet-banking-img

इंटरनेट बँकिंग

आजकाल कोणालाही इंटरनेट शिवाय एक दिवस काढणे अवघड आहे, इंटरनेट मनोरंजनाबरोबर त्याच्या दैनंदिन कामातही महत्वाचा घटक आहे. आमचे अनेक ग्राहक नोकरदार आहेत व त्यांना छोट्या-मोठ्या कामाकरिता संस्थेत येणे शक्य होत नाही, त्यांच्या करता व्यंकटेश मल्टिस्टेटची इंटरनेट बँकिंग सुविधा महत्वाची ठरते. या द्वारे ग्राहक सर्व प्रकारची कामे घर अथवा ऑफिस मधून त्याच्या वेळेनुसार सहजपणे करू शकतो.

sms-banking-img

MISS CALL बँकिंग

ग्राहकांकडे स्मार्ट फोन अथवा इंटरनेट नसेल तर MISS CALL बँकिंग ही सुविधा उपयोगी ठरते. यामध्ये तुम्ही खात्यातील शिल्लक फक्त 7755905555 या नंबरवर मिस कॉल करून तपासू शकता.