दशकपूर्ती वर्षानिमित्त व्यंकटेश मल्टीस्टेटचा छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)येथे सिंहगर्जना- २०२३ कार्यक्रम उत्साहात….
विश्वासाहर्तेतून जनमानसात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या व्यंकटेश मल्टीस्टेटच्या दशकपूर्ती निमित्त सिंहगर्जना कार्यक्रमाचा सोहळा छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) येथे पार पडला. यावेळी मनोरंजन कार्यक्रम तसेच विविध पदावर उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला....
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे, नागेबाबा उद्योग समूहाचे अध्यक्ष कडूभाऊ काळे,फेडरेशन ऑफ मल्टीस्टेटचे संचालक शिवाजीराव कपाळे ,गोदावरी अर्बन,नांदेडचे संचालक धनंजय तांबेकर , डिझाईन ॲडिक्टचे संचालक ज्ञानेश शिंदे , व्यंकटेश शुगर प्रा.लि.चे समाधान डोईफोडे, पिओसीट सॉफ्टवेअर प्रा.लि.चे संचालक अभिजित नांगरे, फिनलिप फिनसर्वहचे संचालक विपुल वाडिया ,व्यंकटेश मल्टीस्टेटचे संस्थापक अभिनाथ शिंदे, सहसंस्थापक व्यंकट देशमुख, सहसंस्थापक कृष्णा मसुरे, सहसंस्थापक अनिल गुंजाळ, सीईओ मंगेश देहेडकर आणि सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थीत होते.
मा.ओमप्रकाश कोयटे यांनी व्यंकटेश मल्टीस्टेटच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक करताना आर्थिक क्षेत्रात शिस्त आणि धडाडी असेल तर संस्था मोठी भरारी घेऊ शकते असे सांगून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कडुभाऊ काळे यांनीही व्यंकटेश मल्टीस्टेटचे टीम वर्क आणि व्यवस्थापन याचे कौतुक केले. अभिनाथ शिंदे म्हणाले की,दशकपूर्ती वर्षात संस्था ६०० कोटीं पेक्षा अधिकचा व्यवसाय करण्यात यशस्वी झाली आहे. दहा वर्षांच्या वाटचालीचे सिंहावलोकन करताना पुढील मोठ्या भरारीची सिंहगर्जना आज करण्यात आली आहे. ग्राहकांना सतत सर्वोत्तम सेवा देण्यासाठी संस्था कटिबद्ध असून यात कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
कर्तृत्ववान माणसांमुळे सहकाराचा मोठा विस्तार : श्री.सुरेशराव वाबळे
सहकार मित्र परिवारातर्फे मा.कृष्णा मसुरे, सी.ए. मा.अमित फिरोदिया यांचा सत्कार सोहळा उत्साहात! नगर : सहकारातील युवा रत्नांच्या सत्कार समारंभास अध्यक्ष म्हणून उपस्थित राहताना खूप आनंद झाला आहे. नगर जिल्ह्याने, महाराष्ट्राला संपूर्ण देशाला सहकार चळवळीतून समृध्दी कशी साधता येते हे दाखवून दिले आहे. स्व.पद्मश्री विखे पाटील यांच्या पुढाकारातून प्रवरानगरला पहिला सहकारी साखर कारखाना सुरु झाला. आज नगर जिल्ह्यात अनेक सहकारी साखर कारखाने, सहकारी बँका, पतसंस्था कार्यरत आहेत. कर्तृत्ववान माणसांमुळे सहकाराचा कायम विस्तार झाला आहे, असे प्रतिपादन फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को ऑप.क्रेडीट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी केले....
सहकार मित्र परिवारातर्फे व्यंकटेश मल्टीस्टेटचे नूतन चेअरमन कृष्णा मसुरे व नागेबाबा उद्योग समूहाचे सी.ए.अमित फिरोदिया यांचा सहकार क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीबद्दल सुरेश वाबळे यांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नागेबाबा उद्योग समूहाचे संस्थापक चेअरमन कडूभाऊ काळे, साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक शिवाजीराव कपाळे, व्यंकटेश ग्रुपचे संस्थापक चेअरमन अभिनाथ शिंदे, सी.ए. किरण भंडारी, व्यंकटेश मल्टीस्टेटचे सह संस्थापक व्यंकट देशमुख, अनिल गुंजाळ, डिझाईन ॲडिक्टचे ज्ञानेश शिंदे आदींसह सहकारातील विविध मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजन समितीचे सदस्य आर्टिस्ट ज्ञानेश शिंदे यांनी सहकारातील युवा रत्नांच्या सन्मानातून नव्या पिढीला प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले.
व्यंकटेश ग्रुपचे संस्थापक चेअरमन अभिनाथ शिंदे म्हणाले की, नगर जिल्हा हा सहकाराची पंढरी आहे. सहकाराचा मोठा वारसा जिल्ह्याला लाभलेला आहे. हा वारसा पुढे नेण्याचे काम युवा वर्गाचे आहे. कृष्णा मसुरे, अमित फिरोदिया हे युवा सहकारात ठसा उमटविणारे योगदान देत सहकाराचा वारसा पुढे नेण्याचे काम करीत आहेत. सहकारातील हे युवा रत्न खऱ्या अर्थाने इतरांना प्रेरणा देणारे आहेत.शिवाजीराव कपाले म्हणाले की, कृष्णा मसुरे, अमित फिरोदिया यांच्यासारखे तरूण सहकारात उत्कृष्ट योगदान देत आहेत हे पाहून आनंद होतो. अतिशय कमी वयात त्यांनी सहकारात मोठे काम करून दाखवले. नागेबाबा मल्टीस्टेट, व्यंकटेश मल्टीस्टेट या संस्था सहकारातील खरा आदर्श आहेत. सी.ए.किरण भंडारी म्हणाले की, सुरेश वाबळे, कडूभाऊ काळे यांनी सहकार फक्त रूजवलाच नाही तर त्याचे वटवृक्षात रूपांतर केले आहे. त्यांचा अनुभव, नवनवीन संकल्पना खूप अभिनव असतात. कितीही संकटे आली तरी त्यावर हसतखेळत मात कशी करावी हे कडूभाऊ काळेंकडून शिकायला मिळतात. त्यांचा अनुभव व मार्गदर्शन दोन्ही सहकार युवा रत्नांसाठी मोलाचे ठरणार आहे. सहकारात अनेक नवनवीन नियम येत असतात. कायद्याने आणि नियमानुसार काम करणाऱ्या संस्थाच नावारूपाला येवून विश्वासार्हता मिळवतात.
कृष्णा मसुरे म्हणाले की, आयुष्यात मार्गदर्शकाची भूमिका खूप महत्वाची असते. योग्य मार्गदर्शक नसल्याने अनेक संस्था बंद पडतात. सुदैवाने आम्हाला अतिशय चांगले मार्गदर्शक मिळाले व आम्हाला सहकारात पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. सुरेश वाबळे, कडूभाऊ काळे यांच्याकडील अनुभवाचा खजिना कायम ते देत असतात. त्यांच्यामुळेच व्यंकटेश मल्टीस्टेट एका उंचीवर पोहचली आहे. मी 2011 मध्ये क्लार्क म्हणून व्यंकटेश मल्टीस्टेटमध्ये रूजू झालो. आज अभिनाथ शिंदे यांनी संस्थेचे चेअरमनपद माझ्याकडे सोपविले आहे. यातून अनेक नवनवीन जबाबदारींची जाणीव झाली. एक मोठे आव्हान आपल्यासमोर आहे हे कळले. या आव्हानांचा सामना करण्याची प्रेरणा या पुरस्कारामुळे नक्कीच मिळेल, असा विश्वास मसुरे यांनी व्यक्त केला.
अमित फिरोदिया म्हणाले की, माझ्या वाटचालीत माझे गुरू सी.ए.किरण भंडारी यांचा मोठा वाटा आहे. सहकारात काम करताना अनेक नवीन अनुभव मिळाले. नागेबाबा मल्टीस्टेटमध्ये काम करताना कडूभाऊ काळे यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. “सहकारातील युवा रत्न” या सत्कार समारंभास नगर जिल्ह्यातील विविध मान्यवर व मित्रपरिवार उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अमोल बागूल यांनी केले.
व्यंकटेश मल्टीस्टेटने जुन्या पेन्शन योजनेच्या धर्तीवर आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी व्यंकटेश कर्मचारी बेनिफिट (पेन्शन) योजना लागू केली आहे. सन 2023-2024 या आर्थिक वर्षांपासून ही योजना लागू करण्यात येणार आहे. पेन्शनची किमान रक्कम 10 हजार रुपये राहणार आहे. संस्थेच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षेची हमी देण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती व्यंकटेश उद्योग समूहाचे संस्थापक चेअरमन अभिनाथ शिंदे यांनी दिली. या योजनेचे महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे, नागेबाबा उद्योग समूहाचे अध्यक्ष कडूभाऊ काळे,फेडरेशन ऑफ मल्टीस्टेटचे संचालक शिवाजीराव कपाळे ,गोदावरी अर्बन,नांदेडचे संचालक धनंजय तांबेकर , डिझाईन ॲडिक्टचे संचालक ज्ञानेश शिंदे , व्यंकटेश शुगर प्रा.लि.चे समाधान डोईफोडे, पिओसीट सॉफ्टवेअर प्रा.लि.चे संचालक अभिजित नांगरे, फिनलिप फिनसर्वहचे संचालक विपुल वाडिया ,व्यंकटेश मल्टीस्टेटचे संस्थापक अभिनाथ शिंदे, चेअरमन कृष्णा मसुरे, सहसंस्थापक व्यंकट देशमुख, सहसंस्थापक अनिल गुंजाळ, यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले....
व्यंकटेश मल्टीस्टेमध्ये दहा वर्षांची सेवा समाधानकारक रित्या पूर्ण करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना व्यंकटेश पेन्शन योजना लागू होणार आहे. सर्व पात्र कर्मचाऱ्यांचा पेन्शनसाठीचा 100 टक्के हिस्सा संस्था भरणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनसाठी स्वत:चा हिस्सा भरण्याची आवश्यकता नाही. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संस्थेमध्ये किमान 20 वर्षे सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे तसेच स्वेच्छा निवृत्तीच्या बाबतीतही 20 वर्षे सेवा पूर्ण होणे बंधनकारक आहे. संस्थेत सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे आहे. सेवानिवृत्तीनंतर प्रत्येक कर्मचाऱ्यास त्याच्या शेवटच्या पगारातील मूळ पगार व डीए च्या 50 टक्के पर्यंत रक्कम दरमहा पेन्शन म्हणून अदा करण्यात येईल. कर्मचाऱ्याचा मृत्यु झाल्यास त्याच्या पत्नीस तसेच पत्नीचा मृत्यु झाल्यास त्याच्या मुलास वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत पेन्शन अदा करण्यात येणार आहे.या योजनेचे सर्व कर्मचाऱ्यांनी उत्साहात स्वागत केले असुन एक आनंदाचे व उत्साहाचे वातावरन् कर्मचाऱ्यांमध्ये तयार झाले आहे. सभासदांच्या हिता सोबत च कर्मचाऱ्यांचे ही भविष्य व हित संस्थेने जपले आहे. असे मत संस्थेचे सी.ई.ओ. मंगेश देहेडकर यांनी व्यक्त केले.
गुढीपाडवा चैत्र शोभायात्रा 2023 ला आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद! सर्व नगरकरांचे आम्ही ऋणी आहोत! आपलं शहर.. आपला उत्सव..
व्यंकटेश मल्टीस्टेटला अविज पब्लिकेशन व गॅलक्सी इनमा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिष्ठेचा बँको ब्लू रिबन पुरस्कार-2023 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण मा. शरदजी गांगल (अध्यक्ष ठाणे जनता सह बँक), मा.अविनाश शिंत्रे ( मुख्य संपादक, बँको), मा. अशोक नाईक ( संचालक, गॅलक्सी इनमा ) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. अभिनाथ शिंदे, सीईओ मंगेश देहेडकर, ऑपरेशन हेड संदीप शितोळे उपस्थित होते..
दशकपूर्ती च्या वर्षात मिळालेला हा पुरस्कार संस्थेसाठी व सर्व सभासदांसाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे. संस्थेच्या सर्व सभासदांचे खुप खुप अभिनंदन
व्यंकटेश मल्टीस्टेट ला नॅशनल फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट चा सर्वोत्कृष्ट संस्था २०२२ पुरस्कार मिळाला. शिर्डी येथे आज या सहकार गौरव पुरस्कार सोहळ्याचे वितरण मा. उदयजी जोशी (राष्ट्रीय महामंत्री सहकार भारती), मा. काकासाहेब कोयटे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन), मा. सुरेशजी वाबळे (अध्यक्ष, नॅशनल फेडरेशन ऑफ़ मल्टीस्टेट), मा. सुकेश झंवर (संचालक, बुलढाणा अर्बन मल्टिस्टेट) यांच्या हस्ते झाले. यावेळी पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे संस्थापक मा अभिनाथ शिंदे, सह-संस्थापक कृष्णा मसुरे, व्यंकट देशमुख, अनिल गुंजाळ, सीईओ मंगेश देहेडकर, dy. सीईओ अंबादास पांडे, ऑपरेशन हेड संदीप शितोळे.
व्यंकटेश मल्टीस्टेटच्या चकलांबा शाखेच्या 9 व्या वर्धापन दिनानिमित्त व्यंकटेश फाउंडेशन व आनंदऋषीजी नेत्रालाय ,अ. नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते.
यावेळी चकलांबा परिसरातील पंचक्रोशीतील सभासद, खातेदार यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. या शिबिरामध्ये 150 हुन जास्त रुग्णांनी नेत्र तपासणी व 23 हुन अधिक रुग्णांनी मोतीबिंदू शस्रक्रिया साठी नाव नोंदणी केली आहे. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अभिनाथ शिंदे, सी. ई. ओ. मंगेश देहेडकर, विभागीय अधिकारी ज्ञानेश्वर काकडे, आनंदऋषीजी नेत्रालाय, अ. नगरचे कमिटी मॅनेजर कवडे, शाखा व्यवस्थापक हरी दिवटे, मार्केटिंग & डेव्हलपमेंट हेड ज्ञानेश झांबरे तसेच विविध व्यावसायिक, दुकानदार, शेतकरी, उपस्थित होते सर्वांचे मनापासून धन्यवाद.
व्यंकटेश फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त संस्थेच्या हेड ऑफिस मध्ये महिलांसाठी फुल्ल टू धमाल कार्यक्रम घेण्यात आला. यात महिलांनी विविध खेळांचा आनंद लुटला तसेच मनोरंजनपर कार्यक्रमांचा आस्वाद घेतला. विविध गेम्समध्ये सहभागी झालेल्या महिलांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. तब्बल तीन तास सर्व महिला सर्व व्याप विसरून या कार्यक्रमात रममाण झाल्या होत्या. व्यंकटेश फ़ाउंडेशन ने या बहारदार कार्यक्रमातून महिला दिनाची संस्मरणीय भेट दिल्याची भावना सहभागी महिलांनी व्यक्त केली.
बालमटाकळी शाखेमध्ये दशकपूर्ती वर्ष 2023 उत्सव साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मा.ज्ञानेश्वर कारखाना चे संचालक मा.मोहनराव देशमुख,पंचायत समिती शेवगाव मा.उपसभापती मा.रामनाथजी राजपुरे,बालमटाकळीचे उपसरपंच तुषार भाऊ वैद्य, वि.का से .सो. चेअरमन हरीचंद्र घाडगे,भेंडा कारखाण्याचे माजी संचालक चंद्रकांत गरड,संस्थेचे व्हॉइस चेअरमन व्यंकट देशमुख, माणिकराव शिंदे ,डॉ बुधवंत, डॉ पुंडे ,कासम मामा शेख,अशोकजी खिळे ,अशोक छाजेड, डॉ बामदळे, काजवे सुरेश,वसंत दादा घाडगे, सुदाम तात्या शिंदे,पत्रकार इसाक शेख, बाळासाहेब जाधव, दामोदर अण्णा वैद्य, मधुकर पाटेकर उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमात रामनाथजी राजपुरे, मोहन बापू देशमुख, तुषार भाऊ वैद्य, काजवे गुरुजी यांनी श्री व्यंकटेश मल्टीस्टेट करत असलेल्या सेवे विषयी मनोगत व्यक्त केले व देत असलेल्या ग्राहक सेवा विषयी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे व्हॉइस चेअरमन व्यंकट देशमुख यांनी केली, विभागीय व्यवस्थापक श्री काकडे सर यांनी अनुमोदन केले तसेच कार्यक्रमाचे आभार बालमटाकळी शाखेचे शाखाधिकारी अमर गरड व बोधेगाव शाखा व्यवस्थापक अंतरकर सर यांनी आभार मानले.
सर्वसामान्यांना आर्थिक पत देण्याचे व्यंकटेश मल्टीस्टेटचे कार्य कौतुकास्पद: महंत गुरूवर्य रामगिरीजी महाराज
वैजापूर: कोणताही व्यवसाय करताना स्वार्थ आणि परमार्थ याचा संगम असला पाहिजे. स्वार्थी मनुष्य कायम यशस्वी होऊ शकत नाही. अभिनाथ शिंदे व त्यांचे सर्व सहकारी सामाजिक बांधिलकीतूनच आर्थिक संस्था उत्तमरित्या चालवत आहेत. व्यंकटेश मल्टीस्टेट सर्वसामान्य गरजूंना आर्थिक पत देऊन त्यांची भरभराट साधण्याचा कौतुकास्पद प्रयत्न करीत आहे. अशा कार्यामुळे समाजातील आर्थिक विषमतेची दरी कमी होते. वैजापूर येथे नूतन कार्यालयात आज व्यंकटेश मल्टीस्टेटचे स्थलांतर झाले आहे. नवीन जागेतून ग्राहकांना आणखी चांगली सेवा मिळेल असा विश्वास श्रीक्षेत्र सराला बेटाचे महंत मठाधिपती हभप महंत गुरूवर्य रामगिरीजी महाराज यांनी व्यक्त केला.
...
शिक्षण हे प्रगतीचे महाव्दार आहे. शिक्षणामुळे मनुष्य सर्वार्थाने सुजाण नागरिक बनतो. दहावी, बारावी परीक्षेत चांगले यश मिळवणार्या गुणवंतांच्या हातूनच बुलंद भारत निर्मिती शक्य होईल. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे, त्यांना प्रोत्साहित करणे कर्तव्य आहे. हे विद्यार्थी इतरांसाठी प्रेरणा मंत्र ठरतील. याच उद्देशाने व्यंकटेश फाउंडेशन स्थापनेपासून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करीत आहे. यंदाही व्यंकटेश मल्टीस्टेटच्या 22 शाखांच्या माध्यमातून 132 शाळा व महाविद्यालयातील दहावी, बारावीत शाळेत प्रथम, व्दितीय,तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
भारतातील नामांकित व 86 वर्षांची परंपरा असलेल्या नवभारत तथा नवराष्ट्र वृत्तसमूहाच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा "Emerging Multistate of the Maharashtra ” हा पुरस्कार मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते स्वीकारण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून सहकारातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
व्यंकटेश परिवारातील 2 लाख सभासदांचा हा पुरस्कार असुन सर्व सभासदांच्या वतीने पुरस्कार स्विकारताना संस्थेचे संस्थापक चेअरमन अभिनाथ शिंदे...
"चला जग जिंकूया" या व्यंकटेश मल्टीस्टेट परिवारातील सर्व सहकारी बांधवांसाठी चर्चा सत्र आयोजित केले होते. प्रमुख मान्यवर म्हणून साई आदर्श मल्टीस्टेट व पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. शिवाजीराव कपाळे, श्री. विनयजी पत्राळे (संस्थापक भारत-भारती), पतसंस्था फेडरेशनचे महासचिव डॉ. शांतीलाल सिंधी, महाराष्ट्र, प्रथितयश उदयोजक व समता पतसंस्थेचे संचालक श्री. संदीपजी कोयटे , छत्रपती मल्टीस्टेटचे संस्थापक श्री. संतोष भंडारी, प्रा. गणेश देशमुख यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. अभिनाथ शिंदे, व्हा. चेअरमन श्री. व्यंकट देशमुख, संचालक मा.श्री. कृष्णा मसुरे, संचालक मा.श्री. अनिल गुंजाळ, मा.श्री.मंगेश देहेडकर (मुख्य कार्यकारी अधिकारी), मा.श्री. अंबादास पांडे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी), व्यंकटेश फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक ज्ञानेश झांबरे उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. राजेश भैय्या टोपे साहेब यांनी श्री व्यंकटेश मल्टीस्टेटच्या घनसावंगी शाखेस सदिच्छा भेट दिली.
घनसावंगी शाखेची रचना पाहुन खुप समाधान व्यक्त केले. संस्थेबद्दल माहिती विचारली, संस्थेने केवळ ८ वर्षात ३५० कोटीचा व्यवसाय केल्याबद्दल विशेष कौतुक केले, बँकिंग च्या येणाऱ्या नवीन टेक्नॉलॉजी व व्यवसायाबाबत बाबत मार्गदर्शन करुण संस्थेच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यंकटेश परिवाराकडुन मा.साहेबांचा सत्कार करण्यात आला.