आपल्या गुंतवणुकीवर योग्य मोबदला आणि केलेली गुंतवणूक सुरक्षित ठेवणे आम्ही आमची जबाबदारी मानतो. आम्ही मुदत ठेवींवर जास्तीत जास्त परतावा देत सुरक्षितता देतो.
निवृत्तीनंतर काहींपैसे गुंतवून दर महिन्याला लागणारी रक्कम मिळावी यासाठी व्यंकटेश मल्टीस्टेटची मासिक ठेव योजना उपयुक्त ठरते. गुंतवणुकीवर प्रतिमहा आकर्षक व्याजदरासह परतावा.
उद्याच्या मोठ्या गरजा व स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजपासूनच छोटी-छोटी बचत करायला हवी. आवर्तक ठेव योजनेमध्ये गुंतवणूक म्हणजे शिस्तीत बचत होते व भविष्यात आपल्याला एक मोठी रक्कम मिळते.
लहानसहान गरजा पूर्ण करता करता मोठी स्वप्नं स्वप्नंच राहून जातात. पण आता नाही! तुमचं प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण, व्यंकटेश मल्टीस्टेटच्या दाम दीडपट ठेव योजना, ज्यात गुंतवणुकीवर मिळेल पाचपट फायदा.
मुलांचे लग्नकार्य हा आपल्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. यामध्ये मोठ्याप्रमाणात पैश्यांची गरज असते, याची पूर्व तयारी या अनुषंगाने या योजनेत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.
जमलेली बचत जर योग्य ठिकाणी गुंतवली तर त्यातून भरपूर फायदा मिळू शकतो. सुरक्षित आणि खात्रीशीर मिळकतीचा राजमार्ग,जिथे आपल्या गुंतवणुकीवर ठराविक काळानंतर मिळेल तीन पट फायदा!
मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळकतही हवी मोठी! व्यंकटेश मल्टिस्टेटच्या दाम दुप्पट योजनेत ठराविक काळानंतर तुम्हाला मिळते दुप्पट रक्कम. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
ती! जिच्या केवळ घरात असल्याने आनंद नांदतो, तिच्या पावलांनी घरात सुख फुलतं, त्या लाडक्या लेकीचे स्वप्नं पूर्ण करा व्यंकटेश मल्टीस्टेटच्या लाडकी लेक ठेव योजनेच्या मदतीने!
आजच्या गरजांसह भविष्यातील स्वप्नंही पूर्ण करता यावीत म्हणूनच सादर आहे व्यंकटेश मल्टीस्टेटची 'फ्युचर बिल्डर ठेव योजना'. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
आजच्या छोट्याश्या गुंतवणुकीतून भविष्याची मोठी बचत तयार होते. स्वतःला छोट्या छोट्या बचतीची सवय लावायला हवी. या योजनेत रोज कमीत कमी रक्कम गुंतवून उद्या एकत्रितपणे एका मोठ्या रकमेचा लाभ घेऊ शकता.
महिला व्यवसायाला आणखी सक्षम व सबळ करण्यासाठी श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटी सादर करीत आहेत महिला बचत गट ठेव योजना.संस्थेच्या या योजनेत महिला बचत गटाची कामे सुरक्षित तर राहतीलच, शिवाय त्यावर उत्तम परतावा देखील मिळेल.