एका उत्तम व्यवसायिकाला साथ हवी असते ती विश्वासार्ह व परिपूर्ण बँकिंग सेवांची, जी पूर्ण होते श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटी मध्ये! कारण आम्ही आमच्या खातेधारकांना उपलब्ध करून देतो अत्याधुनिक बँकिंग सुविधा आणि जोडीला व्यवसायात आर्थिक स्थैर्य मिळावं म्हणून भक्कम पाठबळ! तुम्ही जर एक व्यवसायिक आहात तर आजच आपले चालू खाते उघडा आणि मिळवा NEFT / RTGS / IMPS, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, स्वाईप मशीन, आधार बँकिंग, इत्यादी सुविधा एकाच छताखाली.
निवडा व्यवसाय वृद्धीचा मार्ग श्री व्यंकटेश मल्टीस्टेट! अधिक माहितीसाठी नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.
दिवस रात्र एक करून, काबाडकष्टाने एक-एक रुपया जोडून जमवलेली रक्कम एका सुरक्षित आणि विश्वासार्ह हाती हवी, तेव्हाच एका सर्वसामान्य माणसाला शांत झोप लागते. श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटी तुमच्या या बचतीचे महत्त्व जाणते, म्हणूनच तुमची बचत आम्ही जबाबदारीने सांभाळतो आणि त्यावर जास्तीत जास्त परतावा देखील देतो. इतकंच नाही तर बचत खात्यासोबत चेकबुक, NEFT, RTGS, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, एसएमएस बँकिंग या सुविधादेखील देतो, जेणेकरून गरजेच्या वेळी तुम्हाला तुमची रक्कम त्वरित मिळावी.
आता आपल्या बचतीला सुपूर्द करा एका विश्वासार्ह ठिकाणी, बचत खात्यासंदर्भात अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.
कुटुंबातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील तर प्रत्येक कुटुंब सुरक्षित, समृद्ध व सुखी राहील आणि म्हणूनच श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटी सादर करीत आहेत सखी समृद्धी बचत खाते! महिलांच्या सबलीकरण व सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाला महिला वर्गाकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेंतर्गत महिलांना झिरो बॅलन्समध्ये सखी समृद्धी खाते उघडता येते, ज्यात त्यांना 50 हजार रुपयांचा अपघाती विमा मोफत मिळतो व सोबतच सखी समृद्धी क्रेडिट कार्ड देखील दिले जाते.
एका सक्षम भविष्यासाठी आजच निर्णय घ्या. सखी समृद्धी बचत खाते उघडण्यासाठी नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.