शुभमंगल ठेव योजना

शुभमंगल ठेव योजना

मुलांचं लग्न हे आई-वडिलांच्या आणि मुलांच्या आयुष्यातील एक महत्वाचा, अत्यानंदाचा व कायम लक्षात राहणारा क्षण असतो. त्यात कुठल्याही प्रकारची कमी राहू नये, कुणाच्याही इच्छा-आकांक्षांना तडा जाऊ नये, हा सोहळा कायम एक अविस्मरणीय सोहळा व्हावा यासाठी अनेक कुटुंब तत्परतेने झटत असतात, त्यासाठी मोठा खर्च देखील करावा लागतो. अशात आपल्या बचती, घरातील दागिने, वेळप्रसंगी घर आणि शेतीदेखील विकल्याची उदाहरणं आपल्या ऐकण्यात आली असतीलच, मात्र वेळीच निर्णय घेऊन लग्नासाठी आतापासूनच पूर्वतयारी केली तर कुठलीही अडचण न येता लग्नाचा आनंददायी सोहळा अगदी सहज पार पाडता येईल.

आता मुलांच्या लग्नकार्याची चिंता सोडा, श्री व्यंकटेश सोसाटीच्या शुभमंगल ठेव योजनेंतर्गत मुलाच्या/मुलीच्या जन्मानंतर रु.४५ हजार एकरकमी गुंतवले तर १८ वर्षानंतर तुम्हाला रु.४ लाख मिळतात. ही रक्कम आपल्यावरील आर्थिक भार खूप हलका करेल व तुमचे आनंदाचे क्षण कुठल्याही आर्थिक व्यत्ययाशिवाय आनंदाने पार पडतील. शुभमंगल ठेव योजनेच्या अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी सपर्क साधा.

shubhmangal-thev-yojana-img

विविध बँकिंग सेवा विनंतीसाठी संपर्क करा


आता आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी वाट पाहू नका, तुमच्या जीवनाचा प्रत्येक आनंद अनलॉक करा, तुमच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी श्री व्यंकटेश मल्टीस्टेट कटिबद्ध आहे.

श्री व्यंकटेश मल्टीस्टेट बँकेच्या सर्व श्रेणींच्या विस्तृत माहिती व सेवा विनंतीसाठी आमच्याशी संपर्क साधा. व्यंकटेश मल्टीस्टेट बँकेचे तज्ज्ञ सहाय्यक 24/7 आपल्या सेवेत सज्ज आहेत; जेणेकरून आमच्या समस्त ग्राहकांना एका अतुलनीय डिजिटल बँकिंग सेवेचा अनुभव घेता येईल.

तुमच्या इच्छा व स्वप्न तीन सोप्या टप्प्यात पूर्ण करा -


  • 1. आमच्या संपर्क फॉर्मवर जा आणि अर्ज करा.
  • 2. आवश्यक तपशील भरून फॉर्म सबमिट करा.
  • 3. आमचे ग्राहक सेवा कार्यकारी तात्काळ तुमच्याशी संपर्क साधतील.
Let us help your business grow!