नेटबँकिग करतांना ‘ही’ काळजी घ्या
बदलत्या काळासोबत बँकिंग क्षेत्रात असंख्य बदल झाले. पूर्वी आर्थिक व्यवहार करण्साठी अथवा साधे स्टेटमेंट घेण्यासाठी तासंतास बँकेत वाट पहावी लागायची. पण आज नेटबँकिंगमुळे बँकिग व्यवहार अगदी सुलभ व सोपे झाले आहेत. आता घरबसल्या आपण हवे ते व्यवहार करू शकतो. बँकिंग सोपी झाली असली तरी आजही सुरक्षित व्यवहार करतांना किंवा दैनंदिन जीवनात काही काळजी घेणं फार आवश्यक आहे.
- नेटबँकिंगद्वारे व्यवहार करतांना सायबर ठगांकडून आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्या.
- आपला पिन, OTP किंवा पासवर्ड कुणालाही सांगू नका.
- नेटबँकिंग करणाऱ्यांनी महिन्यातून एकदा आपला पासवर्ड नक्की बदलावा.
- ऑफिस किंवा इतर सार्वजनिक ठिकाणची उपकरणे वापरून नेटबँकिंग व्यवहार करू नका.
- नेटबँकिंग व्यवहार करतांना सार्वजनिक वायफायचा वापर करू नका.
- आपली नेटबँकिंग बाबतची वैयक्तिक माहिती कायम गोपनीय ठेवा.
- कुठल्याही प्रकारचे व्यवहार करतांना तुमच्यावर कुणी नजर ठेवून नाही ना याची काळजी नक्की घ्या.
अशा छोट्या छोट्या सवयी आणि काळजींद्वारे आपण सुरक्षित नेटबँकिंग करू शकतो आणि आपल्या पैशांची काळजी घेऊ शकतो.