Raksha Bandhan: रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. बाजारात सर्वत्र रंगीबेरंगी राख्या दिसून येत असून बहिणी आपल्या भावासाठी सुंदर आणि खास राखी खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. रक्षाबंधन हा फक्त राखी बांधण्याचाच सण नाही, तर बहीण-भावामधील प्रेम, विश्वास आणि एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याचे नाते अधिक घट्ट करणारा दिवस आहे. राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला ओवाळणी किंवा भेट देतो. नेहमीप्रमाणे चॉकलेट, ड्रेस, घड्याळ किंवा इतर भेटवस्तू देण्याऐवजी यंदा थोडा वेगळा विचार तुम्ही करू शकता.
यंदा बहिणीला अशी भेट द्या, जी तिची आर्थिक बाजू सक्षम करायला भविष्यात उपयोगी पडेल. म्हणूनच रक्षाबंधनाच्या ओवाळणीसाठी FD, RD किंवा Pigmy Account यासारख्या आर्थिक पर्यायांचा तुम्ही विचार करू शकता. मात्र कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित योजनेचे व्याजदर, नियम, कालावधी, जोखीम, शुल्क आणि पैसे काढण्याच्या अटी समजून घेणे महत्त्वाचे आहे.. चला तर आपण याविषयी सविस्तर समजून घेऊया..
FD म्हणजेच Fixed Deposit हा बचत आणि गुंतवणुकीसाठी वापरला जाणारा लोकप्रिय पर्याय आहे. बहिणीच्या नावाने FD करण्याचा विचार रक्षाबंधनाच्या निमित्ताने करता येऊ शकतो. FD करताना ठराविक रक्कम एका निश्चित कालावधीसाठी ठेवली जाते आणि त्यावर संबंधित संस्थेच्या नियमांनुसार व्याज मिळते. त्यामुळे तुम्ही वन टाइम गुंतवणूक करू करून बहिणीला मुदत ठेवीची पावती भेट देऊ शकता. तसेच, FD करताना व्याजदर किती आहे? FDचा कालावधी किती आहे? मुदतपूर्व पैसे काढल्यास काय नियम आहेत? किमान किती रक्कम जमा करता येते? याची सर्व माहिती घेऊन गुंतवणूक करणं फायद्याचे ठरू शकते..
Recurring Deposit (RD) म्हणजेच RD. या पर्यायात दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करून ठराविक कालावधीनंतर जमा झालेली रक्कम आणि लागू व्याज मिळू शकते. बहिणीसाठी नियमित बचतीची सुरुवात करून द्यायची असल्यास RDचा विचार करता येऊ शकतो. RD करताना कालावधी, मासिक हप्ता, व्याजदर, मुदतपूर्व पैसे काढण्याचे नियम आणि इतर अटी तपासणे महत्त्वाचे आहे.
पिग्मी अकाउंट (Pigmy Account) किंवा पिग्मी बचत हा काही सहकारी संस्थांमध्ये उपलब्ध असलेला बचतीचा पर्याय आहे. यामध्ये नियमितपणे ठराविक रक्कम जमा करण्याची पद्धत असू शकते. रोज थोडी-थोडी बचत करण्याची सवय लावणे हा आर्थिक शिस्तीचा एक मार्ग ठरू शकतो. बहिणीच्या नावाने बचतीची सुरुवात करण्यासाठी हा पर्याय विचारात घेताना संबंधित संस्थेचे व्याजदर, खाते नियम, किमान रक्कम, कालावधी, पैसे काढण्याच्या अटी आणि शुल्क आधी समजून घ्या.
आजच्या काळात आर्थिक स्वावलंबन हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे रक्षाबंधनाची भेट फक्त वस्तू देण्यापुरती मर्यादित न ठेवता Financial Inclusion म्हणजेच आर्थिक समावेशन आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणूनही पाहता येते. विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागात बँकिंग व आर्थिक सेवांची पोहोच वाढवणे महत्त्वाचे आहे. बहिणीच्या नावाने बचतीची सुरुवात करून देणे ही अशाच आर्थिक सक्षमीकरणाची छोटी पण अर्थपूर्ण सुरुवात ठरू शकते. कारण, महिलांनी आर्थिक सक्षम होणं ही काळाची गरज आहे..
रक्षाबंधनासाठी FD, RD किंवा Pigmy यांसारख्या आर्थिक पर्यायांचा विचार करताना योग्य आणि विश्वासार्ह संस्थेची निवड करणे महत्त्वाचे आहे. व्यंकटेश मल्टीस्टेट (Venkatesh Multistate) आपल्या सभासदांना विविध आर्थिक आणि बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गेल्या १३ वर्षांपासून विश्वसनीय व पारदर्शक सेवा देत आहे. संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना बचत, आर्थिक नियोजन आणि विविध आर्थिक सेवांशी जोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणीसाठी आर्थिक भेट देण्याचा विचार करत असल्यास व्यंकटेशच्या विश्वसनीय सेवेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. तसेच, वर दिलेल्या आर्थिक पर्यायांचा वापर करून आपल्या बहिणीला भेट देऊ शकता.. व्यंकटेशच्या सुविधा आणि सेवांविषयी अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही 1800 5322 111 या क्रमांकावर काॅल करू शकता किंवा जवळच्या शाखेला भेटही देऊ शकता..