पर्सनल लोन हे असुरक्षित कर्ज आहे. वैद्यकीय आपत्कालीन खर्च, घराची दुरुस्ती, शिक्षण किंवा इतर वैयक्तिक गरजांसाठी अनेकजण या कर्जाचा वापर करतात. या कर्जासाठी कोणतीही मालमत्ता तारण ठेवावी लागत नसल्याने बँका आणि वित्तीय संस्था कर्ज मंजूर करण्यापूर्वी अर्जदाराचे उत्पन्न, पतक्षमता आणि परतफेड करण्याची क्षमता तपासतात. या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा भाग आहे KYC म्हणजेच Know Your Customer. या प्रक्रियेद्वारे ग्राहकाला जाणून घेतल्या जाते.
KYC ही व्हेरिफिकेशन प्रक्रिया आहे, ज्याद्वारे बँका आणि वित्तीय संस्था ग्राहकाची ओळख आणि पत्ता व्हेरिफाय करतात. कर्ज प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक आणि नियामक नियमांनुसार होण्यासाठी KYC आवश्यक असते. या प्रक्रियेत ग्राहकाला ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा सादर करावा लागतो. KYC मुळे फसवणूक, बनावट ओळख, आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंगसारख्या प्रकारांना आळा घालण्यास मदत होते.
होय, पर्सनल लोनसाठी KYC करणे अनिवार्य आहे. KYC पूर्ण केल्यानंतर कर्जदार संस्थेकडे तुमची वैयक्तिक माहिती, जसे की ओळख, पत्ता, बँक तपशील आणि मोबाईल क्रमांक उपलब्ध होतो. त्यामुळे बनावट कर्ज अर्ज आणि फसवणुकीच्या घटनांवर नियंत्रण ठेवता येते. KYC द्वारे कर्जदाता तुमची ओळख निश्चित करतो आणि तुमच्या आर्थिक व्यवहारांचा इतिहास तसेच पतक्षमतेचा अंदाज घेतो. कर्जाची परतफेड न झाल्यास व्हेरिफाय केलेल्या माहितीद्वारे ग्राहकाशी संपर्क साधणे सोपे होते. फसवणूक, सायबर गुन्हे किंवा आर्थिक वाद उद्भवल्यास KYC नोंदी महत्त्वाची भूमिका बजावतात. KYC न केल्यास कर्ज अर्ज नाकारला जाऊ शकतो किंवा मंजुरी प्रक्रियेला उशीर होऊ शकतो. तसेच, KYC साठी सादर केलेली कागदपत्रे खरी आणि वैध असणे आवश्यक आहे. चुकीची किंवा बनावट कागदपत्रे सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
डिजिटल बँकिंगच्या वाढत्या वापरामुळे अनेक वित्तीय संस्था आता e-KYC सुविधा उपलब्ध करून देत आहेत. आधार प्रमाणीकरणाद्वारे ग्राहकाची माहिती काही मिनिटांत व्हेरिफाय केली जाते. ऑनलाइन अर्ज करताना आधार क्रमांक टाकल्यानंतर UIDAI कडून माहिती त्वरित व्हेरिफाय केली जाते. सर्व माहिती योग्य असल्यास कर्ज मंजुरीची प्रक्रिया जलद होते. काही बँका आणि वित्तीय संस्था ऑफलाइन KYC प्रक्रियेलाही प्राधान्य देतात. यामध्ये ओळख, पत्ता आणि उत्पन्नाचे पुरावे सादर करावे लागतात.
KYC प्रक्रिया ही फक्त औपचारिकता नसून सुरक्षित आणि पारदर्शक कर्ज व्यवहाराचा महत्त्वाचा पाया आहे. यामुळे फसवणूक आणि ओळख चोरीचा धोका कमी होतो, तसेच कर्ज मंजुरीची प्रक्रिया अधिक जलद आणि सुरळीत होते. KYC प्रक्रिया अपूर्ण असल्यास कर्ज अर्ज मंजूर होण्यास विलंब होऊ शकतो किंवा अर्ज नाकारला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी आवश्यक KYC प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हालाही तातडीने वैयक्तिक कर्जाची गरज असल्यास, आजच व्यंकटेश मल्टीस्टेटशी 1800 5322 111 या क्रमांकावर कॉल करा किंवा आपल्या जवळच्या शाखेला भेट द्या.